Love
Love 
मराठवाडा

फसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा

मनोज साखरे

औरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला लपवत तिला प्रसवकळा सुरू झाल्या. नाजूक शिशू जन्मले पण हातून घडलेल्या चुकीमुळे शिशूला टाकून देण्याची वेळ आली. अकाली आईपणाने ती हताश झाली पण आता पश्‍चात्तापाशिवाय काहीही उरले नव्हते.

विद्यापीठ परिसरात शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी जिवंत शिशू आढळले. मातेने सोडून दिल्याची बाब समोर आली. शिशूवर उपचार करून त्याला शिशुगृहातही ठेवले. रविवारी मातेचा शोध लागला तेव्हा अंतर्मन पिळवटून निघेल, अशा धक्कादायक बाबी उलगडल्या. ऐन भरात तरुणाईकडून झालेली एक चूक आयुष्याला कोणत्या वळणावर घेऊन जाईल, याची शाश्‍वती नाही. प्रेमात अडकविलेल्या तरुणीला गर्भधारणा झाली, हे समजल्यानंतर फार उशीर झाला होता. पर्वताएवढं दुःख ऐकून आईची हतबलता वाढली. दुसरीकडे प्रियकर उजळ माथ्याने फिरत होता. आठ महिने होऊनही त्याने थोडीही सहानुभूती दाखविली नाही. प्रसूतीनंतर मग मूल टाकून देण्याची वेळ आली. हे जळजळीत वास्तव प्रेमाच्या बहरात अडकलेल्यांसाठी झणझणीत अंजन ठरले.

असा झाला उलगडा
तिला गर्भधारणा झाल्यानंतर समाजापासून ही बाब लपवून ठेवण्यात आली; पण एका व्यक्तीची नजर गेली, ती लक्षही ठेवत होती. प्रसूतीनंतर शिशू टाकून देऊन तासाभरात ती घरी पोचली. बेवारस बाळ सापडल्याचे वृत्त समजल्यानंतर नजर ठेवणाऱ्याच्या मनात शंका आल्या. त्याने पोलिसांशी संपर्क साधून क्‍लू दिला व नंतर सारा प्रकार समोर आला.

रिक्षातील चूक नडली
वर्षभरापूर्वी ती नातलगाकडे रिक्षाने जाताना तोही तिला रिक्षातच भेटला. बोलता-बोलता दोघांनी मोबाईल क्रमांकांची देवाण-घेवाण केली. ओळख, गोडीगुलाबी अन्‌ फसव्या प्रेमातून तिचे त्याने लैंगिक शोषण केले. तिला गर्भधारणा झाली. हे समजताच त्याने तिला दगा दिला. आठ महिन्यांपासून तो तिच्या संपर्कातही नाही.

पोलिसांचा पुढाकार
आई-वडिलांनी सत्तरी पार केलेली. शिवाय मुलगी साधी-भोळी. या साऱ्या बाबी समजून तिचे पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी समुपदेशन केले. माणुसकीच्या नात्याने पोलिस अधिकाऱ्यांनीही तिच्या भविष्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, नोकरीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT