Parli Crime News
Parli Crime News 
मराठवाडा

अगोदर अपघाताचा बनाव, तपासाचे चक्र फिरवताच कॉन्ट्रॅक्टरचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : उचल घेऊन मजुर न पुरविल्याच्या कारणावरून एका वीटभट्टी लेबर कॉन्ट्रॅक्टरचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तालुक्यातील दाऊतपूर येथील दोघांना शनिवारी (ता.२७) अटक केली आहे. येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, धाराजी बनसोडे (रा.पूर्णा, तालुका जि.परभणी) या व्यक्तीचा खुन करण्यात आला आहे. सोमवारी (ता.२२) परळी -गंगाखेड रोडवर मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली होती व या प्रकरणी संशय आल्याने तपास सुरू केला. तपासात हायवा खाली चिरडून मृत्यू झाला व अपघात  झाल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले. धाराजी बनसोडे यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी दाऊतपूर  येथील विटभट्टी मालक धनराज बिडगर व अन्य एका साथीदारास ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये, शहरचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे व इतर पोलीस कर्मचारी यांनी या प्रकरणाचा छडा लावला व दोघांना अटक केले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ३०२ खुनाचे कलम लावले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी जायभाये हे करीत आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT