file photo 
मराठवाडा

लक्ष्मी नृसिंह शुगर्सकडून सव्वालाख साखर पोत्याचे उत्पादन- चेअरमन राजेंद्र नागवडे 

गणेश पांडे

परभणी ः आमडापूर (ता. परभणी) येथी श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स साखर कारखान्याने अत्यंत कमी कालावधीत तब्बल 1 लाख 25 हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले असून कारखान्याची गाळप क्षमता ओलांडत अवघ्या 24 तासात तब्बल 3 हजार 685 टनाचे विक्रमी गाळप केले आहे अशी माहिती कारखाण्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी शुक्रवारी (ता.25) पत्रकार परिषदेत दिली.

आमडापूर (ता.परभणी) येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एस.एल.पी. या साखर कारखाण्याने अल्पावधीत ऊस गाळपाचा उचांक गाठला आहे. तसेच कारखान्याच्यावतीने इथेनॉल प्रकल्पाची उभारणी देखील सुरु कऱण्यात आली आहे. या संदर्भात चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी माहिती दिली. यावेळी कारखान्याचे संचालक संजय धनकवडे, प्रमोद जाधव, मुख्य व्यवस्थापक सुशिल पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना श्री. नागवडे म्हणाले, कारखान्याने अत्यंत कमी कालावधीत 1 लाख 25 हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याची प्रतिदिन क्षमता 2 हजार 500 मेट्रीक टन असतानाही अवघ्या 24 तासात 3 हजार 685 टनाचे विक्रमी गाळप केले आहे. पहिल्या एक लाख टनाचे गाळप 34 दिवसात पूर्ण तर पुढील एक लाख टनाचे गाळप 30 दिवसाच्या आत करण्याच्या दिशेने कारखाना प्रशासन वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.  चालू गळीत हंगामात 4 लाख 50 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे ही श्री. नागवडे यांनी सांगितले. ऊस बिलाचा पहिला हप्ता 2 हजार प्रति मेट्रीक टन या प्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आला असून पुढील गळीत हंगाम 2021 -22 चे सहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे असे त्यांनी सांगितले.

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एस.एल.पी. या साखर कारखाण्याने 45 केएलपीडी इथेनॉल प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे. त्याचे काम प्रगतीपथावर असून एप्रिल 2021 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. या प्रकल्पातून नवीन रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याचे संचालक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT