मराठवाडा

Crime News: जमिनीच्या हिश्श्यासाठी मामासह मामाच्या मुलींना लोखंडी रॉडने मारहाण; लातूरच्या घटनेने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मुरुड: वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा द्या, या मागणीसाठी बहिणीच्या मुलांनी मामासह त्याच्या दोन्ही मुलींना लोखंडी रोड व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना करकट्टा, ता. लातूर येथे रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

करकट्टा ता. लातूर येथील शैलेश अभिमन्यू आल्टे यांचे वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्यावरुन त्यांच्या बहिणीसोबत भांडण न्यायप्रविष्ठ होते. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आईच्या हिश्श्याची जमीन का देत नाही, असं म्हणत मामाला आणि त्यांच्या दोन मुलींना मारहाण झाली.

शैलेश आल्टे यांच्या बहिणीची मुले पृथ्वीराज आत्माराम साबळे व सम्राट आत्माराम साबळे यांनी शैलेश आल्टे व त्यांच्या दोन मुली प्रतीक्षा आल्टे व पोर्णिमा आल्टे यांना लोखंडी रॉड व कुऱ्हाडीच्या दांड्यांनी जबर मारहाण केली.

या घटनेत शैलेश आल्टे यांचा हात मोडला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांची मुलगी प्रतीक्षा आल्टे व पौर्णिमा आल्टे या दोघींचेही हात मोडले आहेत. याबाबत शैलेश अभिमन्यू आल्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुड पोलिस ठाण्यात संशयित आरोपी पृथ्वीराज साबळे व सम्राट साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT