fire. 
मराठवाडा

लातुरातील आग शॉटसर्किटमुळेच; पालकमंत्र्यांकडूनही चौकशीचे आदेश

विकास गाढवे

लातूर: शुक्रवारी गोयल एंटरप्रायजेसच्या शेडला लागलेली आग अग्निशामक दल व पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नांतर आटोक्यात आल्याचे सांगून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आगीच्या या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनीही आग कशी लागली, याची चौकशी करण्याचे आदेश देत अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील सरकारी व निमसरकारीसह महत्त्वाच्या इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल आणि गोजमगुंडे यांना केली.

70 लाखाहून अधिक नुकसान-
या आगीत राजकमल इंद्राज अग्रवाल यांच्या गोयल एंटप्रायजेस या रंगाच्या व हार्डवेअरच्या दुकानातील साहित्याचे अंदाजे 70 ते एक कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे. तसा अर्ज श्री. अग्रवाल यांनी शनिवारी सायंकाळी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिला आहे.

त्यात त्यांच्या दुकानाला शॉटसर्टिकमुळे आग लागल्याचे सांगून त्यांच्या साहित्यासह शेडमधील अमोल ट्रेडर्स व अमृत ट्रेडींग कंपनी या दुकानांचेही नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे पुढील तपास करत आहेत.

(edited by- pramod sarawale)

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT