Latur gas cylinder blast sakal
मराठवाडा

लातुरात गॅस सिलिंडरचा स्फोट

कपड्यांची दुकाने जळून खाक; पावसामुळे आग आटोक्यात

सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील राजीव गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर बसून कपडे विकणाऱ्या एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास घडली.

येथील राजीव गांधी चौकात शासकीय विश्रामगृहाच्या समोर रस्त्यावर शेडमारुन काही कपड्याचे दुकाने थाटण्यात आली आहेत. यात बहुतांश दुकाने हे कपड्यांची आहेत. बेडशिट, पिलो, रजई, टेडिबेअर असे हे विविध दुकाने आहेत. या शेडच्या परिसरातच दुकान मालकही राहतात. सायंकाळची वेळ असल्याने एका ठिकाणी स्वंयपाक केला जात असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका दुकानाला आग लागली.

ती पसरत पसरत इतर दुकानात गेल्याने आठ ते दहा दुकाने जळाल्याचा अंदाज आहे. या आग व धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने या भागातील एखाद्या पेट्रोल पंपालाच आग लागल्याची चर्चाही शहरात रंगली. पण ही दुकाने कापडाची होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यात पाऊसही सुरु झाल्याने त्याचीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. ही आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

पोलिस, माजी नगरसेवकाची सतर्कता

ही घटना घडली त्यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अवेझ काझी याच भागात होते. त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तसेच त्यांच्यासोबत असलेले पोलिस व नागरीकांच्या सहकाऱ्यांनी तातडीने काही दुकानातील माल बाहेर फेकून तो वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच माजी नगरसेवक पुनित पाटील हे देखील याच भागात होते. त्यांनी तातडीने आयुक्त अमन मित्तल यांना याची माहिती देवून अग्नीशमन दलाच्या गाड्या पाठवण्याची विनंती केली. आयुक्त मित्तल यांनी देखील तातडीने गाड्या पाठवल्याने ही आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

Solapur Crime:'साेलापुरात नवविवाहितेचा दहा लाख रुपयांसाठी छळ'; सात जणांवर गुन्हा दाखल, जाचहाट व छळ अन्..

छावणीच्या थकीत बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’; ‘इन्साफ कब मिलेगा’ म्हणत सत्ताधारीच अधिवेशनात आक्रमक !

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT