Latur got National Water Prize
Latur got National Water Prize 
मराठवाडा

लातूरला राष्ट्रीय जलपारितोषिक

विकास गाढवे

लातूर : दुष्काळाच्या संकटाला संधी मानून तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध केलेल्या जलसंधारण कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जलसंसाधन व नदी विकास मंत्रालयाने राष्ट्रीय जलपारितोषिक जाहिर केले आहे. जिल्हा प्रशासनासोबत जाऊ (ता. निलंगा) येथील अनुसूचित जातीच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेने हे पारितोषिक पटकावले आहे. 

जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी तसेच भुजलाची पातळी वाढवण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या जल, संसाधन व नदी विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय जल पारितोषिक स्पर्धा घेण्यात येते. ऑगस्ट 2018 मध्ये राज्य, जिल्हा, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा अशा चौदा गटात ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा गटातून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने तर शाळा गटातून जाऊच्या शासकीय निवासी शाळेने सहभाग घेतला होता.

मंत्रालयाने मंगळवारी (ता. 19) स्पर्धेचे निकाल जाहिर केले असून त्यात जिल्हाधिकारी श्रीकांत यांना यांना नदी व जलसंधारण श्रेणीत प्रथम जलपारितोषिक जाहिर झाले आहे. पारितोषिक व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुष्काळाच्या काळात लोकसहभागातून पोले व श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात नदी, नाला खोलीकरण व रूंदीकरणासह जलसंधारणाची मोठी कामे झाली. या कामांमुळे भुजलाची पातळी वाढून जिल्ह्यातील टंचाईची तीव्रता कमी झाली. यामुळेच यंदा अपुरा पाऊस होऊनही अद्याप टॅंकर लावण्याची गरज पडली नाही. याची दखल घेऊनच मंत्रालयाने जिल्ह्याची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

जाऊच्या शाळेने मुख्याध्यापक दत्तात्रय मुखम यांच्या नेतृत्वाखाली पाणी साठवण, जलसंधारण व वापराबाबत मुलींत जागृती केली. शाळेच्या विंधनविहिर परिसरात दोन लाख लिटर क्षमतेचा साठवण तलाव श्रमदानातून उभारला. शाळा परिसरातील तसेच इमारतीवरील पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवले. यासह विविध उपक्रमांतून तीन वर्षात शाळेतील दोनशे मुलींनी पाणी बचतीचे प्रयोग राबवले. याची दखल घेऊन मंत्रालयाने शाळेची राष्ट्रीय पारितोषिकासाठी निवड केली आहे. दीड लाख रूपये रोख, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवारी (ता. 25) नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT