water shotage in jalkot. 
मराठवाडा

जळकोटकरांचा पाण्यासाठी टाहो! आठ दिवसांपासून पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर): शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असूनही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरूस्ती होईपर्यत टँकरने पाणी पुरवठा करावा अन्यथा नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

3 मार्च रोजी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नादुरूस्त झाली असल्याने आठ दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. नागरिकांना आठ दिवसांपासून टॅंकरने विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर महामार्गाचे काम चालू आहे. रस्ताचे खोदकाम करताना 3 मार्चला रावणकोळा साठवण तलावातून येणारी मुख्य पाईपलाईन खराब झाली आहे. आठ दिवस लोटले तरी अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. नगरपंचायतीवर प्रशासक असल्याने व मुख्याधिकारी आठवड्यातून एकदा येत असल्याने तक्रार घेऊन जावे कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नादुरूस्त झालेल्या दुरूस्ती काम हे ठेकेदार करून देणार असले तरी नगरपंचायतीने पुढाकार घेऊन काम करुन घेणे गरजेचे आहे. पंरतू अद्याप असे होताना दिसत नाही. रावणकोळा साठवण तलावात मुकबल पाणीसाठा असूनही शहरवासीयांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ ठेकेदार व नगरपंचायतीच्या कारभारामुळे आली आहे.

अजूनही पंधरा दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरुळीत होणार नाही असे चिञ सध्या दिसून येत असून पाईपलाईनची दुरूस्ती होईपर्यंत शहराला टँकरने पाणीपुरवठा करावा अन्यथा नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा शहरवासीयासह माजी नगरसेवक महेश धुळशेट्टे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT