Latur Lights Millions Of Candles and Lamps To Fight Darkness Of Corona virus
Latur Lights Millions Of Candles and Lamps To Fight Darkness Of Corona virus 
मराठवाडा

दिव्यांच्या प्रकाशाने झगमगली अवघी लातुर नगरी

सुशांत सांगवे

लातूर: रात्रीचे 9 कधी वाजतात?, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर घड्याळाचा काटा नऊवर येताच शहरातील घरघरांमधील लाईट बंद झाले आणि शितलतेची अनुभूती देणारे दिवे प्रज्वलीत झाले. त्यातून लातूरकरांनी एकतेचा संदेश दिला. काही हौशी नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, भारत माता की जय, अशा घोषणा देत हे क्षण साजरे केले.

कोरोना विरोधात लढण्यासाठी कोणीही एकटे नाही. आपण सगळे एकत्र आहोत, असा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले. या आवाहनाला लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठे पणती, कुठे टॉर्च तर कुठे मोबाइलची फ्लॅश लाईट लावत लातूरकरांनी एकतेचे दर्शन घडवले आणि कोरोना विरोधातील लढाईचे मनोधैर्य वाढवले.

अंधाररूपी कोरोनाचा नायनाट व्हावा म्हणून मोदींनी सुचवलेल्या या उपक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी 'भारत माता की जय', 'गो कोरोना गो', 'एक ज्योत, कोरोनाला हरवण्यासाठी' अशा घोषणा दिल्या. काही भागात शुभंकरोतीचे मंजुळ स्वर घुमत होते. काही उत्साही तरुणांनी रस्त्यावर येऊन फटाक्यांची आतषबाजीही केली. काहींनी 9 मिनिटे तर काहींनी 15 मिनिटांपर्यंत घरातील लाईट बंद ठेवत मनामनातील भीतीचा 'अंधार' बाजूला सारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT