Latur loyal shiv sainik give Letter written in blood ro uddhav thackeray shiv sena ausa  sakal
मराठवाडा

औशाच्या शिसैनिकाने दिले उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहिलेले पत्र!

पत्र पाहून ठाकरेही भारावले

जलील पठाण

औसा (जी. लातूर) : शिवसेनेचे अनेक वरीष्ठ शिलेदार पक्ष सोडून जात असताना तळागळातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र ठाकरे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. औसा शहरातील उपशहरप्रमुख पदावर असणाऱ्या सचिन पवार या तरुणाने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास व्यक्त करीत मुंबई येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते पत्र त्यांना सुपूर्द केले. ज्यांच्यावर विश्वास होता ते शिलेदार सोडून जात असताना एका सामान्य कार्यकर्त्याने रक्ताने लिहिलेले हे पत्र पाहून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही भारावून गेले होते.

शिवसेनेत बंड केलेल्या आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर ठाकरे कुटुंबासह सर्वसामान्य शिवसैनिक टीकेची झोड उठवत असतांना आपल्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सेनेचे मावळेही कांही कमी नाहीत. सेनेला खिंडार पाडून भाजपच्या वळचणीला जाऊन पक्ष आणि पक्षप्रमुखांना धक्का देणाऱ्या बंडखोर आमदारावर अनेक कार्यकर्त्यांनी खरपूस टीका केली आहे. पक्षाच्या या कठीण काळात आपण पक्षप्रमुखांच्या सोबत आहोत हे अनेकांनी जाहीरपणे संगीतलेही. मात्र औसा शहरात उपशहरप्रमुख पदावर काम करणाऱ्या सचिन पवार या कार्यकर्त्याने "उद्धव साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत" अशा आशयाचे पत्र स्वतःच्या रक्ताने लिहून मुंबई येथे पक्षप्रमुखांची भेट घेत त्यांना ते सुपूर्द केले.

स्वतःच्या रक्ताने लिहिलेले ते पत्र आणि कार्यकर्त्यांची निष्ठा पाहून उद्धव ठाकरेही गहिवरले. तुमची अशीच साथ असू द्या, येणाऱ्या प्रत्येक संकटावर आपण मात करून शिवसेनेचा भगवा पुन्हा दिमाखात फडकवू असा विश्वास श्री. ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना दिला. सचिन पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा औसा आणि परिसरात जोरात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT