Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

KEM Doctors Enable 13 Year Old Born Without Ears To Hear: जन्मजात कान नसलेल्या १३ वर्षांच्या मुलाला केईएमच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ऐकू येण्याची क्षमता दिली.
Medical Marvel | KEM Hospital Doctors Restore Hearing in Boy Born Without Ears
Medical Marvel | KEM Hospital Doctors Restore Hearing in Boy Born Without Earssakal
Updated on

थोडक्यात:

  1. जन्मजात दोन्ही कान नसलेल्या १३ वर्षीय चैतन्यला केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बोन-अँकर्ड श्रवणयंत्राच्या साहाय्याने ऐकण्याची क्षमता दिली.

  2. ‘गुरू दक्षिणा माजी विद्यार्थी संघा’च्या माजी विद्यार्थ्यांनी चैतन्यच्या उपचारासाठी ४.२ लाख रुपये जमा करून मदतीचा हात पुढे केला.

  3. चैतन्यला 'मायक्रोटिया' नावाचा दुर्मिळ जन्मजात दोष असून यासाठी त्याची यापूर्वीही शस्त्रक्रिया झाली होती.

Child born without ears hears for first time at age 13: जन्मजात दोन्ही कान नसल्याने ऐकू येत नसल्याची तक्रार घेऊन केईएम रुग्णालयात (KEM Hospital) आलेल्या १३ वर्षीय मुलाला श्रवण क्षमता मिळवून देण्यात रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांना यश आले आहे. विशेष म्हणजे या मुलासाठी आर. एम. भट्ट हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

चैतन्य या मुलाला जन्मजात दोष निदान झाले होते. या मुलासाठी ‘गुरू दक्षिणा माजी विद्यार्थी संघ’ नावाच्या माजी विद्यार्थ्यांनी चैतन्यच्या उपचारासाठी ४.२ लाख रुपये जमा केले. त्‍याला ‘मायक्रोटिया’ (Microtia) नावाचा जन्मजात दोष होता.

ज्यामध्ये बाह्य (आणि कधीकधी आतील) कान विकसित होत नाहीत. १० हजार मुलांमध्ये एका मुलाला असा त्रास होतो. चैतन्यवर २०१८ मध्ये महापालिका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती, पण तीन वर्षांनंतर त्यात अडचण निर्माण झाली, असे चैतन्यची आई अश्विनी घुले यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयाच्या ईएनटी विभागातील डॉक्टरांनी काही महिन्यापूर्वी आर. एम. भट्ट शाळेत शिबिर घेतले होते. त्या वेळी चैतन्य त्या शिबिरात होता. डॉक्टरांनी त्‍याला रुग्णालयात येऊन भेटण्यास सांगितले. त्‍यानंतर डॉक्टरांनी बोन-अँकर्ड श्रवणयंत्र (बाहा) हे उपकरण लागेल, असे सांगितले.

या उपकरणाची किंमत चार लाख रुपये असल्‍याचेही डॉक्‍टरांनी सांगितले. केईएमच्या कान-नाक-घसा प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले की, मुलाला जुने यंत्र अद्ययावत करण्याची आवश्‍यकता होती. आता चैतन्य स्‍पष्‍ट ऐकू शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले. आर एम भट्ट हायस्कूल, गुरू दक्षिणा माझी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष प्रतिमा जोशी, माजी विद्यार्थी संजय खानविलकर, हेमंत कदम, सुभाष पेडणेकर, वैभव शिंदे आणि अमित ढोलम यांनी चैतन्यसाठी पुढाकार घेतला.

FAQs

  1. चैतन्यला नेमका कोणता जन्मजात त्रास होता? (What exact congenital condition did Chaitanya have?)
    चैतन्यला 'मायक्रोटिया' नावाचा त्रास होता, ज्यात बाह्य कान विकसित होत नाही.

  2. त्याच्यावर कोणते यंत्र बसवण्यात आले? (Which device was implanted?)

    बोन-अँकर्ड श्रवणयंत्र (BAHA) बसवण्यात आले ज्यामुळे त्याला ऐकू येऊ लागले.

  3. या उपकरणाची किंमत किती होती? (What was the cost of this device?)
    BAHA उपकरणाची किंमत सुमारे ४ लाख रुपये होती.

  4. मायक्रोटिया म्हणजे काय? (What is Microtia?)

    मायक्रोटिया हा एक जन्मजात दोष आहे ज्यामध्ये मुलाच्या एक किंवा दोन्ही कानांचा पूर्ण किंवा अपूर्ण विकास झालेला नसतो.

  5. मायक्रोटियामुळे ऐकण्यावर परिणाम होतो का? (Does Microtia affect hearing?)

    होय, बहुतेक वेळा मायक्रोटियामुळे एक किंवा दोन्ही कानांद्वारे ऐकण्याची क्षमता कमी होते.

  6. मायक्रोटियामुळे ऐकण्यावर परिणाम होतो का? (Does Microtia affect hearing?)

    होय, बहुतेक वेळा मायक्रोटियामुळे एक किंवा दोन्ही कानांद्वारे ऐकण्याची क्षमता कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com