Latur Road to Nanded railway line Sudhakar Shrangare demand to Raosaheb Danve 
मराठवाडा

लातूर रोड ते नांदेड नवीन रेल्वेमार्ग करा : सुधाकर शृंगारे

लातूर रोड ते नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे मार्गाची उभारणी करावी

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लातूर रोड ते नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे मार्गाची उभारणी करावी, अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. हा मार्ग झाल्यास लातूरसह उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील जनतेला फायदा होणार आहे, असेही त्यांनी श्री. दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले.

दिल्ली येथे श्री. शृंगारे यांनी श्री. दानवे यांची भेट घेवून रेल्वेच्या प्रश्नावर चर्चा केली. लातूर ते तिरुपती ही नवीन रेल्वे गाडी सुरुवात करण्यात यावी, अशी मागणीही शृंगारे यांनी यावेळी केली. या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.

लातूरहून तिरुपतीला थेट गाडी नसल्याने भाविकांना विकाराबाद जंक्शनवरुन प्रवास करावा लागत आहे. तिरुपतीसाठी रेल्वे गाडी सुरू करावी, ही लातूरकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. या गाडीची गरज लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही गाडी सुरुवात करण्यासबंधी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लातूर-मुंबई एक्स्प्रेस गाडीला नव्याने एसी बोगी जोडण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या गाडीला वातानुकूलित बोगी कमी आहेत. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे. ही मागणी देखील मंजूर करण्यात आली आहे. लातूर रेल्वे स्टेशनवर पीट लाईन उभारण्या बाबतही मंत्री दानवे यांनी अनुकूलता दर्शविली आहे. लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा प्रारंभ लवकरात लवकर करण्यात यावा, ही मागणी देखील खासदार शृंगारे यांनी यावेळी केली. या बरोबरच जानवळ येथे भुयारी मार्ग उभारणे, कोविड काळात बंद झालेल्या सर्व गाड्या पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT