latur sakal
मराठवाडा

लातूर : वीस वर्षीय तरुणाचा सीना नदीत गणेश विसर्जन करताना मृत्यू

मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील विशाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला होता. केवळ तीन महिन्यापूर्वीच तो या कंपनीमध्ये कामाला लागलेला होता

सकाळ वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : साकोळ (ता.शिरूर अनंतपाळ) येथील तरुण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना सीना नदी पात्रात बुडून मृत्यू पावल्याने साकोळ गावावर शोककळा पसरली आहे.

साकोळ येथील सौरभ सुभाष बेंबळगे (वय20) हा मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील विशाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला होता. केवळ तीन महिन्यापूर्वीच तो या कंपनीमध्ये कामाला लागलेला होता. शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत गेला होता.

गणपतीचे विसर्जन करतेवेळी त्याचा पाय निसटून तो पाण्यामध्ये पडला व वहात जाऊन नदीपात्रात असलेल्या भोवऱ्यामध्ये अडकून तो दिसेनासा झाला. कोळेगाव आष्टा येथील बॅरेज सध्या भरलेले असून पाणी अतिशय वेगाने नदीपात्रात वाहत होते. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली पण त्यांना त्यात यश आले नाही. रविवारी परत स्थानिक मच्छीमार व अनुभवी पोहणाऱ्यांनी सौरभचा सीना नदी मध्ये शोध घेतला पण सौरभ चा शोध लागला नाही. सोमवारी अखेर एस डी आर एफ च्या जवानांनी नदीपात्रामध्ये सौरभचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला.

अंध मातापित्यांचा आधार हिरावला

सौरभचे मातापिता दोघेही अंध आहेत, सौरभ हाच त्यांचा आधार होता. अंध डोळ्यांनी मातापिता दोघेही सुखाचे स्वप्न पहात असतानाच हा आघात झाल्याने त्यांच्या जीवनात ऊगवणारी सुखाची पहाट काळरात्रीत बदलली आहे. सौरभचा आधारच हिरावला गेल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये परत एकदा अंधकार दाटून आला आहे. सौरभचे गेल्या वर्षीच लग्न झालेले होते.त्याच्यामागे पत्नी, अंध माता-पिता व एक लहान बहीण आहे. सौरभवर सोमवारी सायंकाळी उशिरा साकोळ येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातून गरिबी संपली, एकही माणूस सापडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली घोषणा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चातून कॉंग्रेसचे बॅनर गायब

Pune Graduates Constituency : पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीतच मतभेद; भाजपकडून शरद लाड उमेदवार, अधिकृत घोषणा दिल्लीतून

Stock Market Holiday : नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद! जाणून घ्या कधी ?

Rohit Arya Encounter : स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर, पोलिसांच्या भूमिकेवर शंका? चौकशी होणार

SCROLL FOR NEXT