revolver sakal
मराठवाडा

Lature Crime : रिव्हॉल्वर लावून पैशांची बॅग पळवली

एटीएमचा पिन वापरून बँकेतून पैसही काढले

सकाळ वृत्तसेवा

लातूर - येथील गांधी चौकातील व्यापारी धर्मशाळेसमोर एका कार चालकाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून पैशाची बॅग पळवली. त्या बॅगमधील एमटीएम कार्डचा पिन वापरून एटीएममधून पैसेही काढले. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) घडली आहे.

येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या गांधी चौकातील व्यापारी धर्मशाळेसमोर नागनाथ गंगाधर मोतीपल्ले (रा. पानगाव) हा चालक आपल्या कारमध्ये (क्र. एमएच २४, एएफ ५१३८) रस्त्याच्याकडेला थांबला होता. त्याच्या जवळ एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने मोतीपल्ले यांना खाली तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगितले. त्यानंतर मोतीपल्ले खाली वाकून काय पडले आहे हे पाहत असताना या व्यक्तीने त्यांची मान खाली दाबली व त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर लावले.

त्यानंतर दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीने कारचा दरवाजा उघडून आतमधील बॅग उचलली. काही क्षणात तिसरी अनोळखी व्यक्ती मोटार सायकलवर तेथे आली. त्यानंतर हे तीघेही मोटार सायकलवर बसून तेथून निघून गेले. या चोरट्यांनी चोरुन नेलेल्या बॅगेत १४ हजार रुपये, एटीएम कार्ड, पासबूक होते. एटीएम कार्डसोबत त्याचा पीन नंबर होता. त्यामुळे चोरट्यांनी पुढे जात एटीएममधून पीन नंबरचा वापर करीत ७० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी मोतीपल्ले यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी दिली.

टीएमची अदलाबदल करून ३६ हजार पळवले

दरम्यान येथील बार्शी रस्त्यावर एका एटीएममध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करुन ३६ हजार रुपये पळवल्याची घटना घडली. उत्तम मुळे (वय ६९) हे एसबीआय एटीएममधून पैसे काढत होते. त्याच वेळी तेथे एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने मुळे यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करीत ३६ हजार ८०० रुपये काढून घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: रशियाचं पहिलं आण्विक क्षेपणास्त्र! मारा करण्याची अमर्याद क्षमता; कित्येक किलोमीटरपर्यंत होऊ शकतो विनाश

Latest Marathi News Updates : म्हाळसाकोरे शिवारातील दरोडा उघडकीस

प्रिया-उमेशच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार गाण्यातून ! ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

आता तुम्ही UPI वरून पैसे मागू शकणार नाही, NPCI ची मोठी घोषणा, नव्या नियमामुळे होणार बदल

Walchandnagar Police Station : वालचंदनगर पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन; स्मार्ट पोलिस स्टेशन होण्याचा मिळाला बहुमान

SCROLL FOR NEXT