Lek Ladki Yojana sakal
मराठवाडा

Lek Ladki Scheme : मराठवाडा, खान्देशात ‘लेक लाडकी’ योजनेला चांगला प्रतिसाद ; पालकांनी उघडली 3000 खाती

Lek Ladki Yojana : मुलींच्या जन्मदर वाढावा आणि आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणून सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेला मराठवाडा आणि खानदेशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २,८२२ मुलींसाठी खाती उघडण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बीड : मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली. मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, तर अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा होतात. या योजनेला मराठवाडा, खानदेशात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत २ हजार ८२२ खाती पोस्टामध्ये उघडण्यात आली. सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर विभागात ४७५ खाती उघडण्यात आली. त्यापाठोपाठ जळगावमध्ये ४२४ खाती उघडण्यात आली आहेत.

पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या एक किंवा दोन मुली, एक मुलगा एक मुलगी असल्यास हा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या एक किंवा दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असल्यास हा लाभ मिळेल. १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

लाभ कसा मिळणार?

  • मुलीचा जन्म झाल्यावर ५०००/- मुलीचे जन्म प्रमाणपत्र

  • मुलगी पहिलीत गेल्यावर १०००/- शाळेत दाखल असल्याचा पुरावा (बोनाफाइड)

  • मुलगी सहावीत गेल्यावर ७०००/- शाळेत दाखल असल्याचा पुरावा (बोनाफाइड)

  • मुलगी ११ वीत गेल्यावर ८०००/- विद्यालयात दाखल असल्याचा पुरावा

  • मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५०००/- अविवाहित असल्याचे स्वयं घोषणापत्र, मतदार यादीत नाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ ४०० धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या

Panchwati Crime : सूटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून खून केल्याची माहिती

SCROLL FOR NEXT