Lets defeated the opponents says Pankaja Munde at aurangabad meeting
Lets defeated the opponents says Pankaja Munde at aurangabad meeting 
मराठवाडा

Loksabha 2019 : खोट्या मनाच्या विरोधकांना हरवून दाखवू - पंकजा मुंडे

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेची बैठक आज झाली. या बैठकीत उपस्थित पक्षश्रेष्ठींनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना खोट्या मनाचे असे संबोधले. 

मुंडे म्हणाल्या, 'मी लहानपणापासून 'युती' हाच शब्द ऐकला आहे. भाजप आणि शिवसेना असे वेगळे शब्द मी कधी ऐकलेच नाही. युतीचा संसार चालू नये, यासाठी काही लोक देव पाण्यात ठेऊन बसले होते. पण युतीचा संसार ते मोडू शकत नाही.' 

तसेच, मुंडे यांनी लोकसभा निवडणूकीबद्दल बोलताना आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रातूनच काय तर देशातही निकाल दाखवून देऊ. खोट्या मनाच्या विरोधकांना हरवून दाखवू.'
 
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नेते, मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते.

  • दानवे-खोतकर यांची गळाभेट -

सेना-भाजप बैठकीनंतर दानवे-खोतकर यांची दिलजमाई झाली आहे.
उध्दव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे, मी दगाफटका घेणार नाही, असे खोतकर यांनी म्हटले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT