Ranajagjitsinh-and-omprakash
Ranajagjitsinh-and-omprakash 
मराठवाडा

Loksabha 2019 : चुलत भावांतील लढत ठरणार चुरशीची

सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद - लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या पारंपरिक विरोधकांमध्ये आगामी काळात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये कोण रिंगणात उतरणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर शुक्रवारी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली.

विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे एकमेकांचे चुलत बंधू आहेत. राजकीय कट्ट्यावर दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विधानसभेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार पाटील यांनी राजेनिंबाळकर यांना धूळ चारली होती.

आता त्याचा बदला घेण्यासाठी राजेनिंबाळकर पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच लोकसभेत चितपट करण्यासाठी आमदार पाटील यांनी कंबर कसली आहे, असे कार्यकर्ते सांगतात. दोघांनाही एकमेकांचे सहकारी पक्ष किती मदत करतात, यावरून दोघांच्याही विजयाचे गणित निश्‍चित होणार आहे. 

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा उमेदवारीतून पत्ता कट केल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. या दोन्ही गटांतील शह-कटशहाचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, असे आता बोलले जात आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील अंतर्गत नाराजी शमविण्याचे आव्हान असेल. त्यावरच शिवसेनेच्या वर्चस्वाची दिशा निश्‍चित होणार आहे. दुसरीकडे भाजपची शिवसेनेला किती मदत होते, याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. 

अनेक निवडणुकांत जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते होते. गेल्या काही दिवसांपासून मात्र दोघांचे चांगलेच मनोमिलन झाले आहे. दोन्ही पक्षांतील नेते एकत्रित बैठका घेत आहेत. एकमेकांच्या भांडणात विरोधकांचा फायदा होत असल्याचे लक्षात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला एकमेकांसाठी धावून यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT