संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

परळीत तब्बल २५० कलाकार, घोडे, बैलगाड्या...छत्रपती संभाजी राजेंवर महानाट्य 

प्रा. प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि. बीड) - छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव तसेच महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे तीन प्रयोग परळीकरांनासाठी आयेाजित केले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे परळीकरांना छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास ’याची डोळा’ पाहण्याची संधी लाभणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात उभारलेल्या पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. परळीसह परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य व प्रेरणादायी इतिहास अनुभवायला मिळणार आहे. महानाट्यामध्ये सिनेअभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहेत.

तब्बल २५० कलाकार, घोडे, बैलगाड्या यासह वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेली शिवसृष्टी या नाटकाचे प्रमुख आकर्षण आहेत. सिनेअभिनेते रवी पटवर्धन हे औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत. २८, २९ फेब्रुवारी व एक मार्च असे तीन दिवस या महानाट्याचे प्रयोग दररोज सायंकाळी सातला होणार आहेत. उद॒घाटनाला जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, शकिल कुरेशी आदींची उपस्थिती असेल. 

तीन दिवसीय महानाट्यासह शिवसृष्टी, शिवकालीन गावरचना, शस्त्रास्त्रे, छत्रपती शिवरायांचे सिंहासन आदी शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे. उदघाटन समारंभासह 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यास परळी व परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरक व जाज्वल्य इतिहासास अनुभवावे, असे आवाहन नाथ प्रतिष्ठानने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT