nanded
nanded 
मराठवाडा

नांदेडमध्ये महाराष्ट्र बंदचे पडसाद

सकाळवृत्तसेवा

नांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आज ता.२४ जिल्हाभरात बंद पाळण्यात येत असून, हळू हळू त्याचे पडसाद जिल्ह्यात दिसून येत आहेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ सोमवारी (ता. २3) काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे मराठा समाजात सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे. नांदेड हैद्राबाद महामार्गावर शहरापासून जवळच असलेल्या काकांडी परिसरात वाहतुक थांबवण्यात आली असून एका एसटी बसवर दगडफेक केल्याची माहिती आहे. आष्टा फाटा ता.माहुर येथे आदिलाबाद (तेलंगणा )परिवहन बसच्या काचा फोडण्यात आले असुन, त्या ठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शहरातील तसेच सिडको, हडको परिसरातील, किनवट तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालय सोडण्यात आली आहेत, तर शिवाजी चौक हडको येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा समाजबांधवांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. किनवट आगारकडून तोडफोडीच्या घटना पाहता बस न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळची एकंदरीत परिस्थिती पाहता बंदला नांदेड शहरात प्रतिसाद मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT