Narendra Chapalgaonkar
Narendra Chapalgaonkar 
मराठवाडा

न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मसापचा 'जीवनगौरव' 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीत लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक, कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेने हा पुरस्कार सुरू केला आहे. आतापर्यंत डॉ. सुधीर रसाळ, डॉ. चंद्रकांत पाटील, ना. धों. महानोर, तु. शं. कुलकर्णी, मधुकरराव मुळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहाव्या पुरस्कारासाठी निवृत्त न्या. चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे प्रा. ठाले म्हणाले. 

तरुण वयापासून मसापशी जोडले गेलेले न्या. चपळगावकर पंधरा वर्षांहून अधिक काळ विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. साहित्य महामंडळावरही त्यांनी परिषदेचे प्रतिनिधित्व केले. पंचवीसहून अधिक वर्षे कार्यकारिणीचे सभासद राहिले. महाराष्ट्रातील व बाहेरील वाङ्‌मय व्यवहाराशी निगडित अनेक संस्थांचे ते सभासद आहेत. 2005 मध्ये माजलगाव येथे झालेल्या 26 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे संपादन त्यांनी केले असून, त्यांची सुमारे 30 पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक संस्थांचे वाङ्‌मयीन पुरस्कार मिळालेले आहेत. लवकरच विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना दिला जाईल, असे "मसाप'चे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT