Laxman Pawar won in Gevrai
Laxman Pawar won in Gevrai 
मराठवाडा

गेवराईत भाजपचे पवार विजयी, बीडमध्ये काका-पुतण्यांत घामासान | Election Results 2019

दत्ता देशमुख

बीड - गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार यांनीही ६७९१ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यावर मात केली. इथे शिवसेनेचे बंडखोर बदामराव पंडित यांनीही लक्षणीय मते घेतली. 
आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी २०४०० मतांची आघाडी घेतली आहे. आजबे सुरवातीपासून भाजपच्या भीमराव धोंडे यांच्यापुढे राहिले. केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा यांनीही १८३०० मतांची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे पहिल्या फेरीपासून मागे आहेत. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी १३ हजार ८०० मतांची आघाडी घेतली आहे.

भाजपचे रमेश आडसकर सुरवातीपासून मागे आहेत. एकूण चित्र पाहता राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, भाजपचे लक्ष्मण पवार विजयी झाल्यात जमा आहेत. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, भाजपच्या नमिता मुंदडा व राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांचे मताधिक्क्यही पहिल्या फेरीपासून वाढतच असल्याने त्यांचीही विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे मानले जाते. बीडमध्ये काका-पुतण्यांत घामासान सुरू असून, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर काका शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा ४५०० मतांनी पुढे होते. 

एकूणच सहा विधानसभा मतदार संघापैकी परळी, माजलगाव आणि आष्टी या तीन ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्यात जमा आहे. तर, केज व गेवराईत भाजपचा झेंडा फडकण्याची चिन्हे आहेत. बीडमध्ये मात्र घामासान सुरू आहे. 

 परळीत विजयी जल्लोष सुरू

परळीत धनंजय मुंडे यांचे पहिल्या फेरीपासून मताधिक्क्य सुरू असतानाच त्यांच्या विजयाची खात्री समर्थकांना होती. 20 हजारांच्या पुढे मताधिक्क्य गेल्यानंतर परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरू केला. धनंजय मुंडे सुरवातीपासून मतमोजणी केंद्रात होते. त्यांनीही गुलाल खेळून समर्थकांचा उत्साह वाढविला. 

बीडमध्ये काका - पुतण्यांत घामासान

बीड मतदार संघात शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात पहिल्या फेरीपासून घामासान सुरु आहे. कधी जयदत्त क्षीरसागर ६० मतांनी पुढे तर कधी संदीपक्षीरसागर ५८ मतांनी पुढे असे चित्र होते. १४ व्या फेरीअखेर ५४०० मतांनी संदीप क्षीरसागर आघाडीवर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT