Balaji Kalyankar
Balaji Kalyankar 
मराठवाडा

शिवसेनेचा गड ढासळला, पाचपैकी एका जागेवर विजय । Election Results 2019

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिवसेनेचा नांदेड जिल्हा म्हणून मराठवाड्यात ओळखला जातो. परंतु पक्षांतर्गत मतभेद व भाजपातील काही बंडखोर यामुळे शिवसेनेच्या गडाला जबर हादरा बसला असून जिल्ह्यातून फक्त एकच शिवसेनेचा वाघ बालाजी कल्याणकर विधिमंडळात गेला आहे.

जिल्ह्यामध्ये कै. प्रकाश खेडकर यांनी शिवसेनेची जबर मोट बांधली. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनीही जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून दिले. शिवसेना-भाजप महायुतीच्या बैठकीत जिल्ह्याला पाच जागा आपल्या पारड्यात पाडून घेतल्या परंतु काही ठिकाणी भाजप पक्षाने बंडखोर उभे केले. त्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

नांदेड मतदारसंघात खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्या विरोधात भाजपने दिलीप कंदकुर्ते यांना उभे केले. यात दिलीप कंदकुर्ते ही पराभवाच्या छायेत आहेत. याचा सरळ फायदा काँग्रेसला झाला आहे.त्यानंतर लोहा मतदारसंघात मुक्तेश्वर धोंडगे यांच्या विरोधात शेकापच्या तिकीटावर माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उभे करून निवडून आणले. तसेच हदगाव मतदारसंघात नागेश पाटील आष्टीकर यांनाही शिवसेनेतील बंडखोर बाबुराव पाटील कोळेकर यांचा फटका बसला. त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर जावे लागले.

अनुसूचित जातीचा राखीव असलेल्या मतदारसंघात देगलूर मध्ये शिवसेनेची पिछाडी झाली. येथील आमदार सुभाष साबणे यांना पराभव पत्करावा लागला. जिल्ह्यातून नांदेड उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचा एकच वाघ बालाजी कल्याणकर हा विधिमंडळात गेला. त्यामुळे शिवसेनेच्या गडाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या काळात पक्षाची मोट बांधण्याची जबाबदारी खासदार हेमंत पाटील यांच्यावर पडली आहे
प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT