mahavitaran 
मराठवाडा

महावितरणचा पुढाऱ्यांनाही दणका! विज चोरीप्रकरणी दोन राजकीय व्यक्तींसह सात नागरिकांवर कारवाई

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर): सोनवळा, मंगरुळ, येवरी भागात अनेक दिवसांपासून विद्यूत प्रवाहाचा लोड येऊन सुरुळीत बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. आज (१ एप्रिल) रोजी महावितरणच्या पथकाने कार्यवाही करत दोन राजकीय नेत्यासह अन्य सात असे ९ जणांवर कार्यवाहीचा बडगा उचलला आहे.

तालुक्यातील मंगरुळ, सोनवळा, येवरी भागात वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने दर महिन्याला विज भरणा करणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत या भागातील कर्मचाऱ्यांनी महावितरणकडे तक्रारीही दिल्या होत्या. महावितरणकडून याबाबत जनजागृती करत चोरी करणाऱ्या ग्राहकांना आवाहन करण्यात आले होते. पंरतू चोरी करून विद्यूत प्रवाह घेणाऱ्या व्यक्तींवर त्याचा काहीही फरक पडला नाही. महावितरणच्या पथकांने आज सोनवळा, मंगरुळ येथे धाड टाकून विद्यूत चोरी करणाऱ्या नऊ व्यक्तींवर कार्यावाही केली असून त्यांचे मीटर तपासणी करुन त्यांना नियमाप्रमाणे बिले दिले जाणार आहे.

बिलाच्या तारखेपर्यत बिल अदा नाही केल्यास त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. एकीकडे हे राजकीय नेते विजपुरवठा सुरुळीत करा म्हणून निवेदने, आंदोलन करतात आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच विद्यूत प्रवाहाची चोरी करतात. महावितरणकडून सदरील विजग्राहकांची नावे सांगितले नसली तरी यातील दोन जण राजकीय व्यक्ती आहेत.

महावितरणकडून कोळनूर अंतर्गत सोनवळा फिडरवर अतिरिक्त भार वाढून विजपूरवठा खंडीत होत होता. त्यासाठी त्या फीडरवर विजचोरी शोध मोहीम राबविण्यात आली.  त्यात दोन राजकीय नेत्यांसह इतर सात जणांवर घरगूती वापरासाठी आनाधिकृतरीत्या विजचोरी केल्याने कारवाई केली आहे. पथकात शिरुर ताजबंद उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शिवशंकर सावळे, सहाय्यक अभियंता श्री. भोसले, श्री. मोगरकर, श्री.बेरुळे, श्री.सोळूंके आदि होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT