मराठवाडा

महिला दिन : नांदेड रेल्वे विभागाने केला महिलांचा गौरव, चक्क महिलांनीच चालवली रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने महिलांचा गौरव व्हावा म्हणून, विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने शुक्रवारी (ता.सहा) महिला पायलटने नांदेड ते औरंगाबाद ही विशेष गाडी चालवली असून, टीटी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांनीच चोखपणे बजावली. 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांचा गौरव व्हावा, या उद्देशाने एक ते १० मार्च महिला गौरव मोहिम राबविली जात आहे. त्यानुसार शुक्रवारी व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांच्या उपस्थितीत वरिष्ठ लोको पायलट श्रीमती निधी सिंघ यांनी नांदेड ते औरंगाबाद या विशेष गाडीचा ताबा घेतला. वरिष्ठ तिकिट कलेक्टर श्रीमती मरियम, श्रीमती उज्वला, वर्षा साळवे यांनी प्रवाशांच्या तिकीट तपासणीची जबाबदारी सांभाळली. तसेच आरपीएफ कॉन्स्टेबल आरती वटाणे यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली. 

वरिष्ठ पोईत्समन श्रीमती मधुबाई, एपीएम सुनिता कुमारी यांनी नांदेड ते औरंगाबाद या विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवली. या महिला विशेष गाडीचे पूर्णा, परभणी, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान विविध विभागातील महिलांचा व्यवस्थापक उपिंदर सिंघ, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा समन्वयक अधिकारी चंदा रावलकर यांच्या उपस्थितीत गौरव केला. श्रीमती रावलकर म्हणाल्या, आज भारतीय महिलांना शिक्षण घेवून प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत कार्य करायला भेटत आहे. महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करतांना आपण महिला असल्याचे भांडवल न करता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने ठसा उमटावा. मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ. रवींद्र शर्मा, विभागीय कार्मिक अधिकारी जय शंकर चव्हाण, दक्षिण मध्य रेल्वे कल्याण संगठनच्या सचिव श्रीमती सज्जा यांनीही मार्गदर्शन केले. सहायक कार्मिक अधिकारी श्री. विश्‍वनाथ यांनी सूत्रसंचालन केले. 

‘‘महिलांना सुद्धा पुरुषा समान अधिकार दिले पाहिजेत. महिलांसोबत भेदभाव नको. नुकतेच भारतीय फौजेने महिलांनाही पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणे समान अधिकार आणि संधी देवू केल्या आहेत. भारतीय रेल्वेमध्ये महिलांना पूर्वी पासूनच समान अधिकार आणि संधी दिल्या आहेत’. 
-उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

Raigad Flood Exploitation: रायगडमध्ये पूरग्रस्तांची अमानवी लूट; टपरीवाल्यांकडून अन्न-पाण्याचे दुप्पट-तिप्पट दर, कडक कारवाईची मागणी

Pune Milk Union : पुणे दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशीची टिळेकरांची मागणी; कारवाई करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

Alandi News : पुरामुळे नुकसान झालेल्या नागरी सुविधांसाठी आळंदीला 10 कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT