Accident 
मराठवाडा

कार-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार, नांदेड-हिंगोली महामार्गावरील घटना

बाजार आटोपुन घरी परत जात असताना हा अपघात घडला.

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जि.हिंगोली) : नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर तोंडापूर पाटीजवळ कार दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.२८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड (Nanded) -हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर तोंडापूर पाटीजवळ असलेल्या वजनकाट्याजवळ गुरुवारी (ता.२७) संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान कार (एमएच ०५ एजे २१४८) व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार तुकाराम देवराव सूर्यवंशी (वय ४४, रा. दाती, ता. कळमनुरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Man Died In Accident In Kalamnuri Taluka Of Hingoli District)

तुकाराम हे वारंगा फाटा येथील बाजार आटोपुन घरी परत जात असताना हा अपघात घडला. मृताचे भाऊ शंकर देवराव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख बाबर (Hingoli) हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT