Osmanabad Accident News
Osmanabad Accident News esakal
मराठवाडा

जेवळीत ट्रकच्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू, ट्रकचालक घटनास्थळावरून पसार

सुधीर कोरे

जेवळी (ता.लोहारा) : ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मोटारसायकल व गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला बाजूला सारून ट्रक घटनास्थळावरून पोबारा केला आहे. हा घटना शनिवारी (ता.२६) रात्री साडेआठच्या सुमारास जेवळी (ता.लोहारा) गावाजवळ घडली आहे. याबाबत माहिती अशी की, मुरूम येथील विठ्ठल-साई साखर कारखान्यांत कृषी विभागात कृषी सहायक म्हणून कार्यरत असलेले जेवळी (ता.लोहारा) येथील रहिवासी महाळप्पा हणमंत घोडके (वय- ४५) हे कारखान्यातील काम संपल्यानंतर शनिवारी (ता.२६) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १२ जेपी १०५०) गावी जेवळीकडे येत होते.(Man Died In Accident Near Jewali Of Osmanabad)

भुकंपापूर्वीच्या जुन्या जेवळी गावाजवळ लोहाराहून आष्टामोडकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महाळप्पा घोडके यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सोबत असलेले मित्र अपघाताच्या आवाजाने पाठीमागे येTन पाहिले असता मोटारसायकल व गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला बाजूला सारून अज्ञात ट्रक घटनास्थळावरून पसार झाल्याचे दिसून आले. प्रयत्न करूनही अद्याप त्या वाहनाचा शोध लागला नाही. यावेळी गंभीर जखमी झालेल्या घोडके यांना नागरिकांनी जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शांत संयमी, मनमिळावू कृषी सहायकाचा असा दुर्दैवी मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या परिसरात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून या दोन महिन्यात वाहनाने धडक दिल्यानंतर तीन वेगवेगळ्या घटनेत तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप ती वाहने पोलीसांना मिळू शकले नाहीत. (Osmanabad)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT