manoj jarange patil maratha reservation andolan rally in beed  
मराठवाडा

मराठ्यांना नोटीस काढल्याने आंदोलनाला फायदाच झाला! मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

शहरात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सभेआधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कार्तिक पुजारी

बीड- शहरात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सभेआधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज सभेमध्ये सर्व काही स्पष्ट करणार आहे. सरकारला अजून दोन दिवस वेळ आहे. पण, पुन्हा वाढीव वेळ कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असं जरांगे म्हणाले. ( manoj jarange patil maratha reservation andolan rally in beed pc)

मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका काय याबाबत बीडच्या सभेतून सांगितलं जाईल. पुढची दिशा काय असेल याबाबत सभेमध्ये स्पष्ट करेन. सरकारने संपर्क केलाय, बोलणं सुरु आहे. पण, किती दिवस असंच झुरत ठेवणार. किती दिवस संयमाचा अंत पाहणार आहात. तुम्हीच शब्द पाळत नाही. आणखी किती वेळ द्यायचा, असं ते म्हणाले.

आम्ही कायद्याच्या चौकटीत आरक्षण मागत आहोत. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. आता लोक हुशार झाले आहेत. आणखी किती दिवस अन्याय सहन करणार. आम्हाला आरक्षण हवंय आणि ते ओबीसीमधून घेणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्य त्यांच्याच हातात आहे असं सरकारला वाटायला लागलंय. ऐका त्यांचं, करा त्यांच्या मनासारखं. पण, पुढील काळात मराठा काय करेल हे पाहा. मराठ्यांना आधी कळालं असतं की तुम्ही इतक्या खालच्या विचारांचा आहात. मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं नसतं. मराठ्यांविषयी तुमच्या मनात इतकं विष असल्याचं माहीत नव्हतं. आम्हाला कुचकं बोलू नका, असं म्हणत त्यांनी भुजबळांवर टीका केली.

सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. त्यांनी चार शब्द घेतले होते. त्यावर देखील आम्ही ठाम आहोत. चर्चा किती करायची आता कंटाळा आलाय. आताच गिरीश महाजनांचा फोन आला होता. सगे-सोयरेच्या शब्दावरच चर्चा झाली. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. आता वेळ मिळणार नाही. तुमच्या शब्दांना मान दिला. परत पाठवलं नाही. पण, आता वेळ मिळणार नाही, असं जरांगे म्हणाले.

बीडमध्ये सभा का?

सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणून शब्द दिला होता. पण, गुन्हे मागे घेतले नाहीत. बीडमध्ये सभा घेण्याचं कोणतं कारण नाही. राज्यातील सगळ्या सभांसारखी ही एक सभा आहे. बीडच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्यात. फडणवीस साहेबांना विनंती करतो भुजबळांचं ऐकू नका. तुम्ही नोटीस दिल्यामुळे वेगळीच अडचण निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले.

मराठ्यांना नोटिसा

मी अध्यात ना मध्यात, मग मला नोटीस कशामुळे आली. मग मला नोटीस आलीच ना, ट्रॅक्टर जप्त करणार म्हणताहेत ना, मग मी सभेला जाणारच असं मराठ्यांनी ठरवलंय. आता नोटीस आल्यानं न येणारे देखील आंदोलनाला येतील. त्यामुळे अजूनही गांभीर्याने घ्या. तुम्ही एक डाव टाकला होता. पण, पुन्हा डाव टाकू नका. अन्यथा भयानक परिस्थिती होईल, असं जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT