Manoj Jarange Patil  Sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही - मनोज जरांगे

आरक्षणाचा गुलाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंगावर घेतला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका, शासनाने अध्यादेश , मसुदा ,सगे सोयरे,या बाबतची गुरुवार ( ता.15 ) पर्यंत अंमलबजावणी करावी तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही

दिलीप दखने

वडीगोद्री : आरक्षणाचा गुलाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंगावर घेतला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका, शासनाने अध्यादेश , मसुदा ,सगे सोयरे,या बाबतची गुरुवार ( ता.15 ) पर्यंत अंमलबजावणी करावी तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे मनोज जरांगे यांनी सोमवार( ता.12) रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

मनोज जरांगे हे शनिवार (ता.10 ) पासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. त्यांचा सोमवार( ता.12) रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असुन त्यांनी अन्न, पाणी,व वैघकिय उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे.

त्यांना उठता, बसता येत नाही तरही ते उपोषणावर ठाम आहेत. कायद्याची अंमलबजावणी करावी करीता महाराष्ट्र बंदची हाक हि समाजाने दिली आहे मी समाजाच्या पुढे जाणार नाही, जो निर्णय समाजाने घेतला आहे तो शांततेत करावा असी आपली इच्छा आहे.

कायदा करणे बाबत शासन बोलत नाही, जो पर्यत निर्णय होत नाही तो पर्यन्त मी उपोषण मागे घेणार नाही, हटनार नाही असे जरांगे यांनी सांगितले, मराठे मुंबईला परत येणार नाही असे शासनाला वाटत असेल तर त्यांनी 15 तारखेनंतर बघावे आम्ही परत मुंबईला येतो कि नाही,

याचा 15 तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर परत आम्हाला मुंबईला येण्याबात विचार करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे. आरक्षण बाबत टप्पे शासनाने पाडले आहे, विशेष अधिवेशन घेऊन कायदा पास करण्याची जबाबदारी शासनाचि आहे शासनाने कायद्याची लवकर अंमलबजावणी करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदत करत आहे,

आधी आरक्षण भेटु द्या सर्वांचा फायदा होईल या वेळी पीएचडी धारक यांच्या प्रश्नांवर विद्यार्थांना जरांगे यांनी खडे बोल सुनवले ते म्हणाले आपल्या पुरते पाहु नका गोर गरीब मुलाचा फायदा होण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवा सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे हि माझी भूमिका आहे असे जरांगे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहे असा प्रश्न जरांगे यांना पत्रकाराने विचारला यावर जरांगे यांनी सांगितले की, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, भेट घेण्याचा विषय नाही, आम्ही आरक्षण करीता एकत्र आलो आहे मुंबई सह देशात आंदोलन उभा करू असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

काहिंना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे असि संख्या कमी आहे त्याना पाहिजे असेल तर वेगळ आरक्षण द्या तेही टिकणारे आरक्षण पाहिजे नाही तर त्यांचे हि नुकसान होईल आम्हाला आमचे टिकणारे ओबीसी मधिल आरक्षण देण्यासाठी शासनाने वेळ लावु नये, लवकर विशेष अधिवेशन बोलावुन सगे सोयरे बाबत कायदा करा , अंमलबजावणी करा व गुन्हे वापस घ्यावे त्या शिवाय उपोषण मागे घेणार नाही.

- मनोज जरांगे ,अंतरवाली सराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT