borewell sakal
मराठवाडा

Manwath News : बोरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षीय मुलाला बाहेर काढण्यास यश

आई सोबत शेतात गेलेल्या चार वर्षीय मुलगा बोरवेल मध्ये पडल्याची घटना तालुक्यातील उक्कलगाव शिवारात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

मानवत - आई सोबत शेतात गेलेल्या चार वर्षीय मुलगा बोरवेल मध्ये पडल्याची घटना तालुक्यातील उक्कलगाव शिवारात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. प्रशासनाने तब्बल सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांने मुलाला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुखरूप बाहेर काढले.

उक्कलगाव शिवारातील गट क्र. ९६ येथे सुनील कृष्णासा दगडू यांची शेती आहे. उक्कलगाव येथील अंकुशराव पिंपळे ही शेती बटईने पाहतात. बुधवारी या शेतात तुरीच्या पिकांची खुरपणी सुरू होती. अंकुशराव पिंपळे यांच्या चार वर्षाच्या नातु गोलू सुरेश पिंपळे हा आजीसोबत शेतात आला होता. या शेतात बोरवेल उघड्या अवस्थेत होता.

खेळताना बाहुली या बोरवेल मध्ये पडल्याने बाहुली काढण्याचा प्रयत्न करणारा गोलू बोरवेल मध्ये पडला. या बोरवेल मध्ये तो वीस फूट खोलीवर अडकून बसला होता. गोलू आवाजाला प्रतिसाद देत होता. स्थानिक प्रशासनाने सायंकाळी चार वाजेपर्यंत मुलाला बाहेर काढण्यासाठी बोरवेलच्या बाजूला समांतर खोल खड्डा केला जात होता.

परंतु माती ढासळून मुलाच्या जीवाला धोका होण्याची भीती असल्याने प्रशासनाला पुढचा निर्णय घेता येत नव्हता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहचले.

या पथकाने खोदकाम न करता मुलाचा हाताला फासा टाकून अलगद बाहेर काढले. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. या घटनेत प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक आर रागसुधा, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ, मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी भेट दिली. तहसीलदार पल्लवी टेमकर व निरीक्षक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक कापूरे, मंडळ अधिकारी जगनाथ बिडवे, युवा सेना तालुका प्रमुख कृष्णा शिंदे, संतोष लाडाणे, तलाठी नागरगोजे, धर्मपाल गायकवाड, डॉ. जगदीश शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमकार गायकवाड, डॉ. निनाद दगडू यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT