aurangabad
aurangabad 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha आरक्षण मिळेपर्यंत "बंद' सुरुच ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे 58 ऐतिहासिक मूक मोर्चे काढूनही सरकारने वेळकाढूपणाची भूमिका घेतली. विशेष म्हणजे, दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ठोक मोर्चाचीही दखल न घेतल्याने जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. यामुळे आक्रमक झालेल्या समाजाने आता आरक्षण मिळेपर्यंत बेमुद्दत पुकारण्यात आलेला बंद सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासंबधी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची नुकतीच महत्वपूर्ण बैठक झाली आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसऱ्या टप्यातील मोर्चाला शनिवारी (ता. 21) येथून सुरवात झाली. याची दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे महापूजेला जाता न आल्याने याचे समाजावर खापर फोडले. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी सोमवारी (ता. 23) कायगाव टोका येथे गोदावरीत जलसमाधी घेणार, असा इशारा दिला होता. मात्र, त्यास गृह विभागाने गृहीत धरल्याने जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय युवकाचा बळी केला. दरम्यान, औरंगाबाद - नगर रस्त्यावरील कायगाव येथे कालदुपारपासून ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले आहे. मंगळवारी (ता. 24) सकाळी येथील क्रांतीचौकात मराठा समन्वयकांची बैठक झाली असून आता आरक्षण मिळेपर्यंत बेमुद्दत बंद सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सायंकाळपासून हे आंदोलन तीव्र स्वरुप धारण करेल, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे. 

लोकप्रतिनिधींना करणार टार्गेट 
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन उग्र स्वरुप धारण करीत असतानाही याची कुठल्याही लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बसेस ऐवजी आमदार, खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधी, त्यांची वाहने टार्गेट करण्यात येतील, असा निर्णयही क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतला. यातूनच खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT