मराठवाडा

मराठा क्रांती मोर्चाची सभा पुढे ढकलली

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. तसेच आभार मानणारी सभा देखील क्रांती चौकात होणार होती. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे कळविण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन काढण्यात आले आहे. त्यात म्हटले, की उच्च न्यायालयात बुधवारी (ता. १९) सुनावणी होणार आहे. त्यामुळेच श्रद्धांजली आणि सभा पुढे ढकलण्यात येत आहे. त्यानंतर लवकरच जिल्हाव्यापी बैठक घेऊन सभेची तारीख निश्‍चित करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. मात्र, हाती ठोस काहीच न लागता सरकारचे आभार मानले तर आंदोलन भरकटेल, असाही काही समन्वयकांनी माध्यमांकडे भीती व्यक्‍त केली.

आत्महत्याग्रस्त बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, कुटुंबातील एकास नोकरी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देणे, यासह प्रलंबित मागण्याबाबत लढ्याची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चातर्फे कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT