Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha 
मराठवाडा

Maratha Kranti Morcha : मराठा मोर्चाचे नाव वापराल तर खबरदार!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चा हे नाव समाजाची आस्था आहे. सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठीच हे नाव वापरावे. वैयक्‍तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी कुणी वापर करताना आढळल्यास समन्वयक आणि समाज त्यांना रोखठोक उत्तर देतील, असा ठराव येथील मोर्चातर्फे आयोजित समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चातर्फे टीव्ही सेंटर, हडको परिसरात नुकतीच बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा हे बॅनर वापरून राज्यातील वेगवेगळ्या भागांत राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यात समन्वयकांनी मते नोंदविली. मराठा क्रांती किंवा सकल मराठा या नावाने कुणी पक्ष काढत असेल, तर होणाऱ्या परिणामांना ते स्वत: जबाबदार राहतील. मराठा क्रांती ही समाजाची आस्था बनली आहे.

ज्या वेळेस सामाजिक एकता, अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा असेल, त्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा आंदोलन ताकदीने उभे राहील. इतर वेळी या बॅनरचा कोणी वापर करू नये, असा ठरावच घेण्यात आला आहे.

बैठकीला मोर्चाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, विजय काकडे, रमेश गायकवाड, ॲड. सुवर्णा मोहिते, सुनील कोटकर, मनोज गायके, अंकत चव्हाण, रामेश्‍वर राजगुरेख, शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, प्रशांत शेळके, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, योगेश औताडे, विलास औताडे, रेखाताई वहाटुळे, अशोक वाघ, सतीश वेताळ आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT