agitation for Maratha Reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : टायर जाळून आणि 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देत बाजार गेवराई पाटीवर तासभर रास्ता रोको

बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत शासन वेळकाढू धोरण राबवित असल्याने मराठा समाज आक्रमक आंदोलने करीत आहेत.

आनंद इंदानी

बदनापूर (जिल्हा जालना) - बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत शासन वेळकाढू धोरण राबवित असल्याने मराठा समाज आक्रमक आंदोलने करीत आहेत. तालुक्यातील बाजार गेवराई - कडेगाव पाटीवर दोन्ही गावातील मराठा समाज बांधवांनी सोमवारी (ता. ३०) दुपारी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी समाज बांधवांनी आंदोलनस्थळी टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. यावेळी 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे', 'मनोज जरांगे हम तुम्हारे साथ है' अशा गगनभेदी घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. या आंदोलनात बाजार गेवराई आणि कडेगाव येथील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. रास्ता रोकोची माहिती मिळताच बदनापूरचे पोलिस निरीक्षक सुदाम भागवत आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोचले. आंदोलकांनी त्यांना निवेदन सादर केल्यानंतर रास्ता रोको मागे घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT