मराठवाडा

Manoj Jarange : बीडचे खासदार सोनवणे मराठा आरक्षणासाठी सर्व खासदारांना एकत्रित करणार; मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट

''मराठा आरक्षण ही माझी जबाबदारी असून त्यासाठी मी राज्यपालांची भेट घेणार आहे, त्यांना मराठा आरक्षणाविषयी पत्र लिहिणार आहे. त्याशिवाय सर्व खासदारांना सोबत घेऊन मंत्रिमहोदयांची भेट घेणार आहोत. मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी सरकारकडे मागणी आहे.''

संतोष कानडे

Bajarang Sonawane : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं आहे. गुरुवारी जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून बुधवारी मध्यरात्री बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंची भेट घेतली.

बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. पहिली भेट बीड लोकसभा जिंकल्यानंतर घेतली होती. दरम्यानच्या काळात मनोज जरांगेंनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलंय. मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर सोनवणे यांनी, राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं सांगून सर्व खासदारांना एकत्रित करणार असल्याचं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मराठा आरक्षण ही माझी जबाबदारी असून त्यासाठी मी राज्यपालांची भेट घेणार आहे, त्यांना मराठा आरक्षणाविषयी पत्र लिहिणार आहे. त्याशिवाय सर्व खासदारांना सोबत घेऊन मंत्रिमहोदयांची भेट घेणार आहोत. मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सोनवणेंनी सांगितलं.

दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. मराठा आरक्षणासंदर्भात संसदेमध्ये नुसते विषय मांडू नका, सभागृह बंद पाडा, अशी मागणी आंदोलकांनी केली. दुसरीकडे जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनीदेखील मनोज जरांगे यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भव्य परेड! कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल आणि कडक निर्बंध लागू; कुठे अन् कधी?

SCROLL FOR NEXT