letter written in blood sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना रक्ताने लिहीले पत्र

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील बोरगांव फदाट गावातील हर्षल फदाट या तरूणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहीले.

गजानन उदावंत

जाफराबाद - दुष्काळ आम्हाला जगू देत नाही, आरक्षण शिकु देत नाही, त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाकडे शासनाने लक्ष्य वेधण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील बोरगांव फदाट गावातील हर्षल फदाट या तरूणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहीले आहे. सदरचे पत्र हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिले असुन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यत दिले जाणार आहे.

अधिक माहीती अशी की, सकल मराठा समाजाच्या वतीने जाफराबाद येथे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर मनोज जरांगे यांच्या जाहीर सभेप्रसंगी हर्षल या युवकांने रक्ताने लिहीलेले पत्र श्री. जरांगे यांना देऊन माझ्या भावना मुख्यमंत्र्यापर्यत पोहचवा, अशी विनंती केली.

हर्षल ने मुख्यमंत्री श्री शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात तालुक्यात पाऊस अत्यंत कमी असल्याने दुष्काळाने शेतक-यांचे सामान्य माणसाचे जगने अवघड केले, तर मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्यांना सवलती मिळत नाही, त्यामुळे शिकुन देखिल उपयोग होत नाही, त्यामुळे मराठा समाजाला सरसगट विनाअट आरक्षण दयावे अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT