Agitation for Mobile Tower
Agitation for Mobile Tower sakal
मराठवाडा

Maratha Reservation : चार युवकांकडून मोबाईल टॉवरवर चढून आरक्षण मागणीसाठी आंदोलन

दिलीप गंभिरे

कळंब - मराठा समाजाला शासनाने तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यानी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक वळणावर येवून ठेपली आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील इटकूर गाव एकवटले असून १५ तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत.

यावेळी अचानक गावातील संग्राम जाधव, अमरजित आडसुळ, आकाश गंभिरे, रोहित गंभिरे या तरुणांनी आरक्षणाच्या बाबतीत सरकार टाळाटाळ करीत असल्याची भावना निर्माण झाल्याने सोमवार (ता. ३०) दुपारी १२ वाजेपासून गावातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या उंच मोबाईल टॉवरच्या शेंड्यावर जाऊन बसले आहेत.

शासन मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास अनुकूल आहे. त्यामुळे समाजात रोष व्यक्त करण्यात येत आहे. जरांगे यांची प्रकृती खलावत चालली आहे.अद्यापही आरक्षण बाबत शासन ठोस भूमिका घेत नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही टॉवरच्या खाली येणार नाही, अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे.

हे तरुण टॉवरवरून 'एक मराठा-कोट मराठा' अशा घोषणा देत असून, खाली उभे राहणारे मराठा बांधव देखील त्याच्या घोषणेला जोरदार प्रतिसाद देत आहे. टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या युकांच्या प्रकाराबद्दल माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांची घनास्थळी भेट देवून खाली उतरण्याची विनंती केली.

मात्र, विनंतीला न जुमानता या युवकांनी आरक्षण मिळेपर्यंत टॉवरवर बसून मुक्काम ठोकणार असल्याच्या पवित्र्यावर ठाम राहिले आहेत. दरम्यान, या चारही युवकांनी खाली उतरण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे, बिट अमलदर पोपट जाधव यांनीही मनधरणी केली.

पण आरक्षण कस मिळत नाही, मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत त्या युवकांनी खाली उतरण्यासाठी नकार दिला. दरम्यान टॉवरखाली उतरवण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रयत्न केले नसल्याची माहिती समोर येत आहे. यापुढे आरक्षणसाठी लढा देणाऱ्या लोकांचे काही बरे-वाईट झाले तर याला पूर्णत: सरकार जबाबदार राहील आणि यासाठी सरकारला परिणामही भोगावे लागतील.अशाही पवित्रा तरुणांनी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT