Manoj Jarange Beed Sabha esakal
मराठवाडा

Manoj Jarange: "नवीन मागणीनंतर धनंजय मुंडेंचे कान टाईट अन् ते गुडघ्यावर बसले"; मनोज जरांगे काय म्हणाले? सरकारला दिला इशारा!

Manoj Jarange Beed Sabha: मनोज जरांगे पाटलांनी सांगितले, "आजपासून मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही मागणी सुरू आहे. काहीही झालं तरी मी नाही हटत. तुम्हाला बघितलं की माझ्यात शंभर हत्तीचे बळ येतं.

Sandip Kapde

बीड येथे मराठा आरक्षणासाठी झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. या सभेत मराठा समाजातील चिमुकल्या मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे शांतता यात्रा काढत आहेत. सरकारने आरक्षण दिले नाहीत तर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 

बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा निर्धार-

मनोज जरांगे म्हणाले, "आज छाती सुद्धा फुगली, लेकरावर अन्याय झाल्यावर दंड थोपटून कसं बाहेर यावं लागतं हे बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी दाखवलं. बीड जिल्ह्यातील सर्वच मराठा आता ताकदीने उभा ठाकला आहे. सरकारने मराठ्यांवर पुन्हा एकत्र येण्याची वेळ आणू नये."

गिरीश महाजन यांच्यावर टीका

मनोज जरांगे म्हणाले, "गिरीश महाजन सर्वांना फसवतो. तो म्हणतो सगे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही, मग छगन भुजबळ यांना का लागली? तुम्ही आमच्या विरोधात वडोगोद्रीला कशाला बसवलं? ज्या दिवशी अंतरवलीला 4 जज आले होते ती चर्चा ऐका, गाफील राहू नका. महाजन साहेब आमचं उडलं तर उडुदे, परत दुसऱ्यांदा आंदोलन करू. महाजन साहेब... मला माहितेय सगे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर उडत नाही."

धनंजय मुंडेंना टोला

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंनाही टोला मारला. ते म्हणाले, "माझ्या राज्यातील एकही मराठा अरक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे. ज्या मराठ्यांची नोंद सापडेल, त्या नोंदीच्या आधारावर, मागेल त्याला प्रमाणपत्र ही आमची मागणी आहे. ही मागणी केल्यावर धनंजय मुंडेंचे कान टाईट झाले... ते त्या बैठकीला गुडघ्यावर बसले होते."

मराठा समाजाच्या लढाईचा निर्धार

मनोज जरांगे पाटलांनी सांगितले, "आजपासून मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही मागणी सुरू आहे. काहीही झालं तरी मी नाही हटत. तुम्हाला बघितलं की माझ्यात शंभर हत्तीचे बळ येतं. सरकारने मला घेरायचं ठरवलं आहे. ओबीसींच्या नेत्यांनी सुद्धा मला घेरण्याचं ठरवलं आहे. मला उघडं पाडायचं ठरवलं आहे. सरकारने विरोधीपक्षाला बोलावलं होतं, पण ते नाही आले. तुम्ही सरकार आहात, तुमची राजकिय इच्छाशक्ती आहे ना?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT