परभणी - मराठा आरक्षणप्रश्‍नी गुरुवारी स्टेशन रोड भागात आमने-सामने आलेले आक्रमक आंदोलक व पोलिस.
परभणी - मराठा आरक्षणप्रश्‍नी गुरुवारी स्टेशन रोड भागात आमने-सामने आलेले आक्रमक आंदोलक व पोलिस. 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha चक्काजाम अन्‌ ठिय्या

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मराठा आरक्षणासह अन्य काही मागण्यांसाठी मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनांची धग कायम असून गुरुवारी (ता. २६) ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम, मुंडण, मोर्चे, ठिय्या, टॉवर, पाण्याच्या टाकीवर ठिय्या आदी आंदोलनांचा जोर होता. या आंदोलनांत तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून वेगवेगळी आंदोलने, घोषणाबाजी, बंदोबस्तासाठी पोलिसांच्या ताफ्यांनी शहरे आणि ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले. दरम्यान, आणखी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

परळीत गेल्या बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाल्यानंतर तेथे सुरू झालेल्या ठिय्यानंतर मराठवाड्यात आंदोलने सुरू झाली. सर्वत्र कडकडीत बंद पाळल्यानंतर नवव्या दिवशी आजही वेगवेगळ्या मार्गांनी रोष व्यक्त करण्यात आला. परभणी शहरात दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. त्यात दोन पोलिस जखमी झाले. सेलू तालुक्‍यातील दुधना नदीत अर्धजलसमाधी आंदोलन झाले. तहसीलदारांना पाण्यात उतरवून निवेदन स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजामने जालना जिल्हा ढवळून निघाला. औरंगाबादेतील क्रांती चौकात ठिय्या कायम असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला १०१ प्रदक्षिणा घालून आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले. परळीत नवव्या दिवशीही ठिय्या कायम असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. 

उस्मानाबादच्या कळंबमध्ये शेकडो युवकांनी मुंडण केले, तर अन्य काही भागांत रास्ता रोको झाले. लातूरच्या काही भागांत रास्ता रोको, तर हिंगोलीच्या काही गावांत बंद पाळण्यात आला.

अंगावर डिझेल ओतून घेतले
उस्मानाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी विशाल रोचकरी (तुळजापूर) यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून घेत जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. तुळजापूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच काही दिवसांपूर्वी तुळजापूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केबिनमधून बाहेर काढले. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असतानाच रोचकरी यांनी सोबत आणलेली डिझेलची बाटली अंगवार ओतून घेतली. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी रोचकरी यांना रोखले व ताब्यात घेतले. आनंदनगर पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती.

तरुणाने घेतले विष
पूर्णा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आलेगाव (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील प्रशांत विश्वनाथ सवराते (वय २४) याने काल रात्री गावाच्या मुख्य रस्त्यावर येऊन विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

राजीनामे देण्यावर भर
आरक्षणाच्या मागणीसाठी आता पालिका, ग्रामपंचायत सदस्यही राजीनामा देऊ लागले आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले. जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजलगाव (जि. बीड) पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी राजीनामा दिला. भाजपचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, लासूर स्टेशनचे बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांनी राजीनामे दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT