औरंगाबाद - हनुमाननगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाची मागणी करताना आंदोलक.
औरंगाबाद - हनुमाननगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाची मागणी करताना आंदोलक. 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha आंदोलक तब्‍बल पाच तास पाण्याच्या टाकीवर

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - राज्यभर मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी (ता. २८) आठ तरुणांनी सिडकोतील हनुमाननगरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल पाच तास हे आंदोलन झाले. प्रशासनाने आश्‍वासनाचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी सात दिवसांपासून राज्यभर वातावरण चिघळले आहे. यात तीव्र आंदोलने होत आहेत. आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरीत उडी घेतल्यानंतर आंदोलक आणखीनच भडकले आहेत. सर्वच ठिकाणच्या आंदोलकांवर किरकोळ, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी शहरातील आठ तरुण शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास हनुमाननगरातील पाण्याच्या टाकीवर चढले. तसेच घोषणाबाजी सुरू केली. 

आरक्षणासाठी ते पाण्याच्या टाकीवर चढल्याचे शहरभर समजल्यानंतर हजारोंचा जमाव पाण्याच्या टाकीजवळ जमा होत होता. पोलिसांनी गेट उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आत उडी मारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अभिजित देशमुख टाकीवर गेले. त्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी टाकीवर जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक खाली उतरले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा उपस्थित होता.

जिल्हाधिकारी, पोलिसांची भूमिका
काही दिवसांतील मराठा मोर्चातील आंदोलकांवर प्रशासनाकडून दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याबाबत प्रशासन व शासन सकारात्मक असून लवकरच यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. पोलिसांनी कळविले की, आमच्या स्तरावर या आंदोलनाबाबत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. तरी, तुमचे आंदोलन मागे घेण्यात यावे.

आंदोलकांना घेतले खांद्यावर
आंदोलक अशोक मोरे, रमेश गायकवाड, सचिन मिसाळ, अशोक वाघ, संजय सोमवंशी, संतोष काळे, सुभाष सहाणे, विशाल पवार यांच्यासह आमदार हर्षवर्धन जाधव, अभिजित देशमुख चर्चेनंतर खाली आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खांद्यावर घेतले. त्यानंतर जमावासह पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी जाधव म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून, मराठा समाजातील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT