औरंगाबाद - एमआयटीच्या एअर फेस्टमध्ये सहभागी झालेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी.
औरंगाबाद - एमआयटीच्या एअर फेस्टमध्ये सहभागी झालेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी. 
मराठवाडा

हवेत झेपावले विद्यार्थ्यांचे आरसी प्लेन

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - लहानपणी कागदी विमान हवेत सोडल्यानंतर संथपणे तरळते तेव्हा मन हुरळून जाते, अगदी तसाच अनुभव स्वत: तयार केलेले आरसी (रिमोट कंट्रोल) प्लेन हवेत झेपावल्यानंतर आल्याचे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (ता. २४) झालेल्या ‘एअर शो’मध्ये विद्यार्थ्यांना हा अनुभव आला.

एमआयटीच्या इलेक्‍ट्रिकल ॲण्ड इलेक्‍ट्रॉनिक विभागातर्फे ‘टेक इलेक्‍ट्रा’ हा इव्हेंट होत आहे. त्यात ‘एअर फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. पुणे, जालना, औरंगाबाद येथील १२ महाविद्यालयांच्या २१ गटांतून ८६ विद्यार्थी सहभागी झाले होते. २२ आणि २३ तारखेला आरसी प्लेन बनविण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी महाविद्यालयातर्फे फोम शीट, क्‍लोरो प्लॉस्ट तसेच इलेक्‍ट्रिकलमध्ये बीएलडीसी मोटर, सर्वो मोटर, प्रोपेलर, व्हील आणि रिमोट कंट्रोल देण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी स्वत: विमाने बनवली होती. महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये शनिवारी दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान ती आकाशात झेपावली. या वेळी विद्यार्थ्यांनी ड्रोनही तयार केली होती.

विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. नीलेश पाटील, इलेक्‍ट्रिकल ॲण्ड इलेक्‍ट्रॉनिक विभागाच्या प्रमुख डॉ. एस. एम. बडवे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून अनिकेत खांडेकर, भागवत गिरी, चैतन्य महाजन, गणेश शेळके, वृषभ जाधव, गीतेश माळी, वैभव कराड, किरण वाघ, पूजा पारीख, वनिता इंगळे, मयूरेश जोशी यांनी समन्वय केले.

अभियांत्रिकीच्या याआधीही कार्यशाळा केल्या; मात्र आरसी प्लेनबाबत मराठवाड्यात पहिल्यांदाच कार्यशाळा झाली. कार्यशाळेत सांगितल्यानुसार साईज, कॅल्युलेशनप्रमाणे आरसी प्लेन तयार केले. ते यशस्वी झाल्याचा आनंद आहे.
- भूषण खर्डेकर (सहभागी विद्यार्थी), मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT