Eknath Shinde Sakal
मराठवाडा

Marathwada Mukti Sangram Day: सगळी कसर भरुन काढणार; मराठवाड्याच्या विकासाचं CM शिंदेंचं आश्वासन

मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी संपवण्याचं आश्वासनही यावेळी शिंदेंनी दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सकाळीच औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, केंद्रीय मंत्री भागवत कराड हेही उपस्थित होते. शिवसेना भाजपा युतीचं सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं आहे.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. निजामांच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका व्हावी, यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केलं आणि श्रद्धांजली वाहिली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या लढ्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचं मोल कुणीच करू शकत नाही, अशा भावना यावेळी शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मराठवाड्यातल्या काही विकासकामांची माहितीही दिली. यामागची सगळी कसर या शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात भरुन काढण्यात येईल. घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसंच रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामं वेगानं व्हावीत, यासाठीही भरीव तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी संपवण्याचं आश्वासनही यावेळी शिंदेंनी दिलं आहे. वॉर रुमच्या माध्यमातून विकास कामांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचंही शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT