file photo 
मराठवाडा

३१ मार्चला स्टेट बॅंकेच्या सर्व शाखा रात्री ११ पर्यंत चालणार

सकाळ वृत्तसेवा

परभणी  : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने बॅकांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. परंतू वित्तीय वर्ष संपण्याच्या दिवशी ता. ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील कोषागार  कार्यालयासह भारतीय स्टेट बॅंकेच्या सर्व शाखा रात्री ११ पर्यंत उघड्या ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.२८) दिले.

वित्तीय वर्ष २०१९ - २०२० अखेरच्या दिवशी ता. ३१ मार्च रोजी २०१९ - २०२० चे प्राप्त अनुदान खर्ची पाडणे व आर्थीक व्यवहार पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व उपकोषागार कार्यालये रात्री ११ वाजेपर्यंत तसेच भारतीय स्टेट बँक (स्टेडीयम शाखा) परभणी तालुकास्तरावरील भारतीय स्टेट बँक सर्व शाखा रात्री ११ वाजेपर्यंत कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.

तालुकास्तरावरील शाखा रात्री ११ वाजेपर्यंत

याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी विनंती केल्यामुळे महाराष्ट्र कोषागार नियमाच्या तरतुदीनूसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ता. ३१ मार्च रोजी भारतीय स्टेट बैंक (स्टेडीयम शाखा) परभणी तसेच शासकिय व्यवहार करणाऱ्या तालुका स्तरावरील सेलु, गंगाखेड, पाथरी, पुर्णा, जिंतूर, पालम, सोनपेठ, मानवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा रात्री ११ वाजेपर्यंत २०१९ - २०२० या आर्थीक वर्षाचे सर्व शासकिय व्यवहार पुर्ण करण्यास्तव चालू ठेवणेबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.२८) आदेश दिले आहेत.

हेही वाचा - बेघरांसाठी भाजपचे ‘कम्युनिटी किचन’

सर्व बिले सादर करावित : वायकर
आर्थिक वर्ष २०१९- २० मधील अनुदानाच्या निगडीत बिल्स देयके ‘बिल पोर्टल प्रणालीवरून’ ता. २७ मार्च २०२० पर्यंत निर्गमित झालेल्या प्राधिकार पत्रासह सादर करण्यात आलेली देयके ता. ३० मार्च २०२० सोमवारपर्यंत दुपारी ०१ वाजेपर्यंत  कोषागार, उपकोषागारात स्विकारली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी श्री सुनील वायकर यांनी दिली. या बाबत लेखा व कोषागार संचालक यानी  २८ मार्च २०२० रोजी सूचना , आदेश दिले आहेत. त्यानुसार  सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत अनुदानाशी निगडित सर्व बिले सादर करावित  असे आवाहन श्री. वायकर यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT