Suicide 
मराठवाडा

लेकीच्या लग्नादिवशीच पित्याची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - दोन महिन्यांपासून मुलीच्या लग्नाची लगबग सुरू झाली. लग्नघटिका जवळ आली. सोमवारी (ता. 17) एका लॉन्समधील लग्नस्थळी सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार जमला; पण त्याच घटिकेला मुलीच्या पित्याने घरात आत्महत्या केली. मुलीला हे दुःख सहन होणार नाही आणि लग्नावर विरजण पडू नये म्हणून मुलीचे लग्न दुपारी लावून सासरी पाठविण्यात आले.

औरंगाबादेतील म्हाडा कॉलनीत ही हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी घडली. मनजित रायभान कोळेकर (वय 45, रा. म्हाडा कॉलनी, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. त्यांची मुलगी मयूरी हिचा महानोर परिवारातील साजन या तरुणासोबत विवाह ठरून 17 डिसेंबर ही तारीख निश्‍चित झाली. त्यानुसार, कुटुंबीयांकडून विवाहाची जोरदार तयारी झाली. अंबिका लॉन्स आडगाव बु., बीड रोड झाल्टा फाटा येथे मयूरीचे सोमवारी 12.10 वाजता लग्न असल्याने पाहुणे मंडळी, आप्तेष्ट लग्नस्थळी पोचले; पण वधुपिता असलेले मनजित कोळेकर न आल्याने त्यांच्याबाबत विचारणा झाली; परंतु इकडे त्यांनी अकराच्या सुमारास घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली होती.

वऱ्हाडींना पाठवले; पण...
मनजित कोळेकर यांनी लग्नाला चला, असे म्हाडा कॉलनीत सर्वांना सांगत लग्नाला पाठविले. त्यानंतर घरी व गल्लीतही कुणी राहिले नाही. यानंतर त्यांनी घरात आत्महत्या केली. त्यांच्या मुलाने मित्राला पप्पा आले नाहीत अजून, घरी बघ, असे सांगितले. मित्र घरी गेला, त्यावेळी कोळेकर यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.

सर्वांना सॉरी...देहदान करा...
मृत्यूपूर्वी कोळेकर यांनी चिठ्ठी लिहिली. माझ्या पत्नीने माझ्या इच्छा पूर्ण केल्या. आता शेवटची इच्छा देहदानाची असून ती पूर्ण करावी, असे सांगून "सॉरी ऑल ऑफ यू' असे चिठ्ठीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT