gopinath
gopinath 
मराठवाडा

कमांडो गोपिनाथ बोरगडांच्या मृत्यूने तेलगावात चूल पेटलीच नाही

सकाळवृत्तसेवा

वसमत (हिंगोली) : तीन वर्षापूर्वी देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या तालुक्यातील तेलगाव येथील एनएसजी कमांडो गोपिनाथ बोरगड यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली असून गुरुवारपासून (ता. 21) गावात चुल पेटलीच नाही. 

तालुक्यातील तेलगाव येथील गोपिनाथ रामचंद्र बोरगड (वय 28)  यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अन्नपूर्णा देवी विद्यालय आरळ (ता.वसमत) येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून घरी दिड एकर शेती आहे. आई, वडील व दोन भाऊ शेतीमधे काम करतात. बोरगड हे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षापूर्वीच ते सैन्यात दाखल झाले होते. हरियाना येथील मानेसर येथील कँम्प मधे त्यांची नियुक्ती होती. एनएसजी कमांडो म्हणून कर्तव्यावर होते. एक वर्षापुर्वीच त्यांचा विवाह झाला होता तर त्यांची पत्नी रेणुका बोरगड ह्या तीन महिन्याच्या गर्भवती आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच दुचाकी घसरून त्यांचा मानेसर येथे अपघाती 
मृत्यू झाला. गुरुवारी (ता.२१) त्यांच्या निधनाचे वृत्त गावात धडकताच गावावर शोककळा परसरली. मनमिळावू तरुण हरवल्याने गावकऱ्यातून हळहळ व्यक्त होत असून मागील चोविस तासात गावात चुलही पेटली नाही. गावकऱ्यांनी त्यांच्या आठवणीमधे संपूर्ण रात्र जागून काढली आहे. शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी उशीरापर्यंत बोरगड यांचा मृतदेह गावात आणला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT