MP Jadhav says about Medical Colleges
MP Jadhav says about Medical Colleges 
मराठवाडा

वैद्यकीय महाविद्यालय आमचा हक्कच : खासदार जाधव

गणेश पांडे

परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता.27) परभणी येणाऱ्या शासनाच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल हा सकारात्मकच राहील, अशी आशा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गुरुवारी (ता.27) सकाळशी बोलताना व्यक्त केली.

परभणी येथे शासकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्याकरिता शुक्रवारी शासनाची त्रिसदस्यी समिती येणार आहे. या समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शासकीय रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.जाविद अथर, आर्थो रुग्णालयाचे डॉ. प्रकाश डाके, शिवसेनेचे राम पाटील, शिवसेनेचे परभणी विधानसभा प्रमुख माणिक पोंढे पाटील आदी उपस्थित होते.

खासदार संजय जाधव यांनी सुरवातीस जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करून रूग्णालयाची पाहणी केली. यावेळी 'सकाळ'शी बोलताना खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्हा रुग्णालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संपूर्ण निकष पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा परभणीकरांचा हक्कच आहे. शैक्षणिक दृष्ट्या व आरोग्य दृष्ट्या हे महाविद्यालय परभणीला होणे अत्यंत गरजेचे आहे. शुक्रवारी (ता.27) येणाऱ्या समितीचा अहवाल निश्चितच सकारात्मक राहील असा आशावाद व्यक्त केला.

आपण स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोललो आहोत. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद राहिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी अस्थापना कार्यालयासाठी देखील भव्य इमारत या रुग्णालयात उपलब्ध आहे. महाविद्यालयाच्या इतर इमारतीसाठी लागणारी जागा देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत, असेही खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT