जिंतूर पोलिस  
मराठवाडा

व्यापाऱ्याची दादागिरी : पोलिसाची लाठी हिसकावून केली शिवीगाळ; जिंतूर येथील प्रकार

संचारबंदीच्या काळात दुकान चालू गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दुकान बंद करण्याची विनंती करताच संतप्त सदरील किराणा दुकानदाराने पोलिस उपनिरीक्षकाच्या हातातील लाठी हिसकावून घेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुला समोर घडला.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : संचारबंदीच्या काळात दुकान चालू गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दुकान बंद करण्याची विनंती करताच संतप्त सदरील किराणा दुकानदाराने पोलिस उपनिरीक्षकाच्या हातातील लाठी हिसकावून घेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुला समोर घडला. या प्रकारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील बलसा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ऋषिकेश प्रोव्हिजनचे मालक प्रल्हाद टाकरस हे संचारबंदीच्या काळात आपले दुकान उघडून बिनधास्त व्यापार करत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी संचारबंदीच्या काळात दुकान बंद ठेवण्याची विनंती सदरील दुकादारास केली. त्यामुळे रागाने संतप्त झालेले दुकानदार टाकरस यांनी पोलिसांसोबत वाद घालू लागला तेंव्हा

पोलिसांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला

उलट त्याने पोलीस अधिकाऱ्यासच एकेरी भाषेत बोलण्यास सुरुवात करुन पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या हातातील लाठी हिसकावून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन त्यांच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर पोलिसांनी त्यास पकडून 'पोलिसी हिसका' दाखवला हा प्रकार सुरु असताना बघ्यांची गर्दी जमा झाली होती. एकीकडे पोलिसांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत केल्या जाते. तर दुसरीकडे भर चौकात व्यापाऱ्याकडून पोलिस अधिकाऱ्यावर अर्वाच्च भाषा वापरुन लाठी हिसकावून दहशत निर्माण करणे हे अशोभनीय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT