milk producer farmer get compensation mla haribhau bagde marathi news
milk producer farmer get compensation mla haribhau bagde marathi news Sakal
मराठवाडा

Phulambri News : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर; आमदार हरिभाऊ यांच्या मागणीला यश

नवनाथ इधाटे

Phulambri News : मागील गेल्या काही दिवसापासून दुधाचे दर घटल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान द्यावे अशी मागणी केली होती.

त्यांच्या या मागणीला यश आले असून शासनाने सहकारी संस्थेला दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे आमदार बागडे विधिमंडळ अधिवेशनात म्हणाले की, राज्यामध्ये शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

ग्रामीण भागात दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमंडू लागले आहे. दुष्काळातून निवडण्यासाठी शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळू लागले आहे.

राज्यात जवळपास 75 लाख कुटुंब दुधाच्या व्यवसायात जोडलेले आहे. एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळून निघाला आहे. तर दुसरीकडे पुन्हा दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दुधाला प्रति लिटर 37 ते 40 रुपये भाव होता. मात्र आता हा भाव सात ते दहा रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करणेही अडचणीचे ठरू लागले आहे. दुष्काळातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे पावले उचलणे गरजेचे आहे.

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती लिटर अनुदान द्यावे जेणेकरून शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय करणे सोपे होईल, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मध्ये केलेली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून सहकारी संस्थेत दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला पाच रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

शेतीला जोड म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र दुधाला भाव कमी असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळे सरकारकडे दुधाला अनुदान देण्याची मागणी केली होती. सरकारने सहकार संस्थेला दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारचे आभार.

- हरिभाऊ बागडे, आमदार फुलंब्री.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT