Minister of State for Environment Water Supply and Sanitation Sanjay Bansode said that Satish Chavan should be elected for the development of Marathwada.jpg 
मराठवाडा

मराठवाड्याच्या विकासासाठी सतीश चव्हाणांना निवडून द्या

जलील पठाण

औसा (लातूर) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून हे सरकार उत्तमरीत्या काम करीत आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार व बेरोजगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ काम करीत आहेत. मराठवाड्यात असे अनेक प्रश्न आहेत जे सोडविण्याचा प्रयत्न होत आहेत आणि ते अधिक गतीने सोडविण्यासाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना तिसऱ्यांदा निवडून देऊन विजयाची हॅट्रिक साधावी, असे आवाहन पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वछता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. १३) औशात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, उमेदवार आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, औसा पालिकेचे नागराध्यक्ष डॉ. अफसर शेख, सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, काँग्रेसचे नारायण लोखंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व पदवीधर मतदार उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, माझ्या आमदार आणि मंत्री बनण्यात आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांचा मोठा वाटा आहे. सलग दोन वेळा श्री. चव्हाण यांनी विजय मिळवला असून आता हॅट्रिक साधायची आहे. योगायोगाने राज्यात आपले सरकार असल्याने चव्हाणांच्या प्रयत्नाने मराठवाड्यातील विशेषतः पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील.

कायम विनाअनुदानित शाळांची वाटचाल अत्यंत कठीण मार्गाने सुरू असून या शाळांना अनुदान मिळण्यासाठी आणि २००५ नंतर शिक्षक सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करू या प्रयत्नाला तुमच्या मतरुपी सहकार्याची गरज असल्याचे आमदार सतीश चव्हाण आणि आमदार विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

महाविकास आघाडीमुळे आपले बळ वाढले असून औसा तालुक्यातून आमदार सतीश चव्हाणांना विक्रमी मताधिक्य देऊ, असे आश्वासन नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी दिले.
 
यावेळी संतोष सोमवंशी, नारायण लोखंडे, गहिनीनाथ महाराज यांनीही आमदार श्री चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : - घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

भाजप नेत्याच्या मुलावर गोळीबार; प्रेयसीच्या घरी मध्यरात्री भेटायला गेल्यावर तिच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या? मारहाण झाल्याचाही संशय

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

SCROLL FOR NEXT