Supplementary Exam 2024 student missing sakal
मराठवाडा

Supplementary Exam 2024 : पुरवणी परीक्षेला आलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

Hingoli Latest news in marathi |दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी शहरात आलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२४) अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी शहरात आलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२४) अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवारी (ता. २३) दहावीच्या गणित विषयाच्या पेपरसाठी शहरातील एका परीक्षा केंद्रावर होता; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला; मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

त्यानंतर कुटुंबीयांनी बुधवारी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल घुले यांच्या पथकाने तपास सुरू केला.

परीक्षेला गैरहजर

दरम्यान, पोलिसांनी परीक्षा केंद्रावर जाऊन माहिती घेतली असता सदर विद्यार्थिनी पुरवणी परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या गावातून, तसेच मैत्रिणींकडून माहिती घेण्यास सुरवात केली. तसेच शहरातील काही भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

SCROLL FOR NEXT