file photo
file photo 
मराठवाडा

आमदार मुटकुळेंनी पाठीवर सोयाबीनचे पोते घेत ट्रॅक्टर केले खाली

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे साधी राहणी उच्च विचार सरणीमुळे मतदार संघात परिचित आहेत. ते शेतीत देखील काम करतात सध्या उडीद काढणी सुरू असल्याने त्यांच्या शेतातील काढलेले उडीद घरी आणल्यावर त्यांनी बुधवार (ता. १६)  एक ते सव्वा क्विंटल चे पंधरा पोते पाठीवर  घेत ट्रँक्टर खाली केले पाहणारे आवाक झाले.

हिंगोली विधानसभा मतदार संघातून एक वेळेस अल्पमताने पराभूत झाल्यानंतर त्यांनी  पुन्हा वडीलोपार्जित शेती करून भाजपाचा झेंडा खांद्यावर घेत २०१४ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. ते शेतकरी असल्याने त्यांनी . सिंचनाचा अनुशेष, कयाधू नदीवरील बंधारे व इतर विकास कामांमुळे ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दुसर्‍यांदा आमदार झाले. 

पंधरा पोते घरात टाकत युवकांनाही लाजवेल असे काम त्यांनी केले

शेतीशी कायम बांधलेले असल्याने ते जनसंपर्क ठेवून आपल्या शेतातही वेळ देतात. यावर्षी त्यांनी  दहा एकर क्षेत्रावर उडीदाचा पेरा केला होता. बुधवारी मळणीयंत्रातून उडीद काढल्यानंतर त्यांच्या आडगाव येथील घरी शेतातून ट्रॅक्टरमध्ये आणलेले पोते त्यांनी स्वतः पाठीवर घेऊन घरामध्ये थप्पी लावली. एका पोत्यात किमान सव्वा क्‍विंटल माल होता. हे पोते एका दमात उचलून पंधरा पोते घरात टाकत युवकांनाही लाजवेल असे काम त्यांनी केले. आमदार असूनही शेतातील उडीदाचे पोते घरात टाकल्याने ग्रामस्थही अव्वाक झाले. त्यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर  व्हायरल झाला असून त्यांच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT